मिथ्य असे संसार सारा
मिथ्यचि परी डोलारा
शाश्वत व्यापिले असे या जगती
एक शिव अन् दुजी शक्ती🙏
असे चराचरी शिव अव्यक्त
"ति" ची शक्ती होई व्यक्त
कधी माया प्रेम ममता
कधी अधर्मी कठोर सक्त
नातुडे स्वरूप तिचे,नातुडे महती
मी अभागी नेणितो सदा
एक शिव अन् दुजी शक्ती🙏
असे प्रपंच जणू
नुसता साबणावरी फेण
ऋणी तो जीव त्याला
जन्मभरी लागे देण
उपाव असे एक केवळ
करी सद्भावाची भक्ती,स्मरे
एक शिव अन् दुजी शक्ती🙏
🙏आपणा सर्वाना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा🙏
-