QUOTES ON #दुष्काळ

#दुष्काळ quotes

Trending | Latest
9 MAY 2019 AT 0:26

सुकलया रान सार
सुकली ती पालवी,
तहानलेल्या ओठानाही
लागलिया वाळवी.

आटल्या रे नद्या साऱ्या
कोरडे ते कालवे,
तापत्या उन्हाची रे
झळ कशी रे जानवे,

भेगाळली रे धरनिमाय
ओलावा ती मागते,
जन्मदाती तीच आता
जीवनाची भिक मागते.

-


11 AUG 2017 AT 21:53

झरा आटत चालला,
झरा आटत चालला
अजूनही बरेच दिवस होते उन्हाळ्याला
पाणी जणू बिलगले तापलेल्या धरणीला
कधी पुरात वाहवणारा पाऊस असा दुष्काळात लपलेला
थेंबाथेंबासाठी इथं प्रत्येक जीव तरसलेला
घशाला कोरड सुखाला मुरड भेगा पडल्या पायाला
पोरं नि पिकांची काळजी जाळतेय इथं मनाला
घरधनीण रोजच हात लावे कपाळाला
आलिया भोगासी सादर दोष देई नशीबाला
आणखी एक नवा विषय सापडला राजकारणाला
पाण्यासंगे माणुसकीही गेली काय रसातळाला

-



कुणाला हक्क कुणाला आरक्षण
कुणाला प्रेवेश
कुणाला इथे अधिकार हवाय
पण रणरणत्या या उन्हात
ओसाड अशा माळरानात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
पाण्याचा एक घोट हवाय
आता आर्थिक मदत नको
सरकारचं अनुदान नको
कर्ज माफीची घोषणा नको
कोणाचीही सहानुभूती नको
दुःखाचा महासागर आठलाय
अन् घसा कोरडा पडलाय
देता आलं तर द्याबाबांनो
पाण्याचा एक घोट हवाय
माय माझी रडतेय
आजी जाग्यावर लोळतेय
बा च्या मनाला चिंता जाळतेय
तरी आत्महत्या करायची नाय
सांगितलंय मी त्याला
हसत हसत सोसू आपण
या दुष्काळाच्या झळा
त्याच्या साठी मला
फक्त तुमचा आधार हवाय
देईल का कुणी मला ?
पाण्याचा एक घोट हवाय

-


8 MAY 2019 AT 20:56

काळ्या ढेकळात पेरतो सोनं,
अंगा-खांद्यावर घामाच्या धारांचं लेणं...

उजळतो भविष्य तृप्त होणाऱ्यांचं,
करतो भलं साऱ्या जगाचं..

स्वतः राहून उपाशी,
पोशिंदा आमचा शेतकरी,
त्याची गाठ नेहमी अस्मानी संकटांशी...

#दुष्काळ #yqtaai

-


8 MAY 2019 AT 22:57

नांगरली काळी माय तापलं रे उन्ह
पावसाच्या थेंबा साठी रडतय मन

उभ्या रानी नाही पाणी टाकली रे मान
गाई गुरा जगवितो उपटून धान

गोठ्यामधी गुर ढोर ,कुठून आणू चारा
पडीक सार शेत झालं कसा भरू सारा

आभाळाला लावून डोळा जीव झाला वेडा
असा कसा टाकलार दुष्काळानं गराडा

घरामधी बायका पोरं पोटाचा रं घोर
कधी बरसल वरून पावसाची सर

पाण्यासाठी करून वणवण तडपडे जीव
आता तरी करून विचार एक तरी झाड लाव

-


8 MAY 2019 AT 23:27

रानोमाळ फिरुन झालंय
हिरवा देठ मिळेना
भेगाळल्या भुईला
काळा मेघ पावेना

चंद्राचा तर तू
विषयच सोडून दे
त्याच्या एवढी
भाकर सुद्धा मिळेना

लाचार झालीय भुक
अन बेईमान झाली भाकर
इथे कष्टाला चोर म्हणून
घोषित केलय

निसर्गाने ही
बाजार मांडलाय
अन् निस्तेज झालंय
सरकार

खचून चाललंय विश्व
जगाच्या पोशिंद्यच....

-


9 MAY 2019 AT 10:04

पडलाय हो दुष्काळ हिरवाईचा
हिरवा शालू नेसलेल्या धरतीचा
इमारतींना जागा देता देता 
वृक्षांची तोड मात्र जाता येता
म्हणे दुष्काळ पडलाय अन्नाचा
परी त्याला काय दोष निसर्गाचा
माणसानेच हे केले सारे
म्हणूनच तर दुष्काळाचे वारे
झाडे लावा झाडे जगवा 
नेहमीच म्हणतो सारे
परी आपणाचेच हे काम सारे
हे मात्र न जाणे मानव सारे
दुष्काळ दुष्काळ असे ओरडुनी
जशाला घसा घेताय  फोडुनी
चला उठा रे लागा कामाला
हिरवा शालू नेसवूया धरतीला
एकीचे बळ हे असते मोठे
तेच उघडेल नशिबाची कवाडे
हात जोडून विनवणी करते
झाडे लावूया अन पाऊस पाडवूया

-


9 MAY 2019 AT 7:26

तोडलेली झाडे , मैदान साफ आहे....
अन् शेतकर्याला इथे मृत्युचा शाप आहे...
टाळुवरचे लोणी पसरे इथे तिथे,
अन् धोरणांचा रोज लिलाव होत आहे....
घामाच्या धारांनी अभिषेक केला,
तरी धरणीमाय कोरडीच का राहे?
बरसु दे सरी , का रे आखडता हात?
चातकाप्रमाणे तुझी वाट इथे पाहे....
होऊ दे पिकपाणी नाहीतर माघार आहे,
पुन्हा माझ्यापरी दुसरा निराधार आहे....
अश्विनी अभिजीत

-


8 MAY 2019 AT 22:47

दुष्काळाचा विखार
हिरवाईने झाकूया,
दोन झाडं प्रेमानं
दारी खरचं लावूया,
तुमच्या आमच्या भवतालचा
दुष्काळ कणभर संपवूया...

-


8 MAY 2019 AT 20:10



सहजच विचारले त्या तळपत्या सूर्याला
का पडल्या एवढ्या भेगा या जमिनीला
आसुसले आहे रे तीच काळीज दोन थेंबासाठी
विरहाचे की प्रेमाच कोणते हे रूप म्हणावे तुमचे
तेव्हा दुष्काळाचे नाव सांगून तो मोकळा झाला
पण माझाच प्रश्न मलाच महागात पडला
कारण पाणी वाया घालवून आपणच माती खाल्ली
अन जिवंतपणी दोन्ही नाती मारली
कोप नाही हा धरणी मातेचा
हा तर विश्वासघात केला आहे एक नात्याचा
पाहिजे तेव्हा ओरबाडून घेतले आणि
वेळ आली तेव्हा तिलाच वाऱ्यावर टाकले
नाही केली वृक्षलागवड, नाही केले शोष खड्डे
तरीपण तिचा पान्हा वर्षोनुवर्षे पाझरतच राहीला
पण थकली आहे ती सुद्धा अपल्यांचेच  घाव सोसून
दुष्काळचे दूषणं तिच्या माथी घेऊन

-