QUOTES ON #ढग

#ढग quotes

Trending | Latest
24 NOV 2018 AT 14:15

विज चमकली मेघ गरजला,
अंगावरती पावसाचा पहिला थेंब बरसला,
निराश झालेल्या मानवाला धीर देऊ लागला.
मातीचा सुगंद सर्वत्र पसरु लागला.
थंड गारवा हवे मध्ये जाणवु लागला.
घननाद ऐकुन मोर पिसारा फुलवुन नाचु लागला,
पाहुन त्याचे मनमोहक नृत्य मन प्रसन्न जाहले.
चातकाला ही आनंद जाहला,
बळीराजा आनंदान गाऊ लागला
आभार वरुण देवाचे मानु लागला.
धरणी माता सुंदर दिसु लागली
हिरवागार शालु, जणु नेसली
नदी नाले खळखळ करत वाहु लागले.
रानातील पाखर गाऊ लागली.
झाडे झुडपे मोहराने बहरु लागली.
आनंदीत सारी सृष्टी जाहली.

-


16 NOV 2018 AT 13:49

मेघाची ही प्रीती या धरणीला का कळत नाही?
घननाद ऐकूनही हा पिसारा आज का फुलत नाही?
जणू वाटते की इंद्राशी रूसली आज इंद्रायणी,
म्हणूनच तर अंबूद ही थेंबाचे सुर बोलत नाही.........

-


12 NOV 2018 AT 18:15

इकडे या मित्रांनो
सांगते तूम्हा गंमत
सांगूच नका मोठ्यांना
आपली ही जंमत

सहल नेऊ आपण
उंच उंच ढगात
मज्जा येईल खूपच
धूक्यांच्या या जगात

हात धरू सा-यांचा
गोल रिंगण करू
उंचच उंच उड्या
ढगांवरती मारू

पांढ-या शूभ्र ढगांचे
गोळे घेवू हाती
फेकून मारू सारे
एकमेकांच्या पाठी

कापूस पिंजल्या ढगांचा
उडवू सारा फज्जा
ढगांच्या सहलीत
येईल खूप मज्जा

शूभ्र पांढ-या मलईत
पाय फसवू सारे
अलगद घ्या काढून
फसून बसाल सारे

शूभ्र पांढरी दूलई
अंगावरती घेवू
धूक्याच्याच गादीवर
सारे झोपी जावू

-


6 MAY 2020 AT 23:48

आज का चंद्राला ढगांवर प्रिती आली.
घनघोर अंधारात ढगांची ज्योत झाली.
आज का ढगांना आनंदाची भरती आली.
चमचमणार्‍या चांदण्याची ओहोटी झाली.

-


16 NOV 2018 AT 12:16

नभ दाटले जे काळे,कुठे संपेल प्रवास,
गावाकडच्या मातीची, भुरळ पडेल का त्यास.

घमातून भिजवल्या आजवर या जमिनी,
थांबावं घटकाभर ,अट्टाहास हा मनी,

मी आणि चातक आज दोघंही आतुर,
कल्लोळ अंतरात, शब्द न दाटले ओठांवर..

कुणा सांगायचे काय, जणू उभा आरसा सामोरी,
तुझ्या आशेवरच आता, दोन वेळची भाकरी.

-


16 NOV 2018 AT 9:27

जीवनाच्या सारीपाटावर
येती जाती ढग
मेघ बरसती अमृतधारा
त्या मेघांना जाग
वायूसंगे खेळ खेळती
जलद नभांगणात
पयोधर मग झरझर झरती
वसुंधरेच्या अंगणात
अभ्र दाटले चोहीकडे
करूनिया अंधार
पक्षी झेपावती घेण्यासाठी
घरट्याचा आधार
किती घाईने अंबूद धावती
देती एकमेका धडका
सौदामिनी मग चपळाईने करते
निरदापासूनी सुटका
अब्द थबकले भान विसरले
पाहूनी हिरवे रान
पावसाच्या सरी सरीतून
बरसले तेथे घन

-


15 JUN 2019 AT 13:13

जेव्हा नभ दाटले
नी मन उष्ण गोठले....
दृष्टी व्यापली काटो काटी
थेंब मोत्याहूनी कोरले....
या आसवांना सोबत तुझी
नक्षत्र मुठीत धरले....
नको समजु तू कोप मनाचा
हे दुःख ओसरले....
चाहूल देत वारा वादळ
ऋतु नभ बरसले....
ढगांना थेंब जड झाले
आज या क्षणी मन गहीवरून आले....

-


6 JUL 2020 AT 9:33

काट्यांवरून चालताना,
फुलांचा कोमल स्पर्श व्हावा.
उन्हाळ्यात राबताना राजा,
ढगांना थोडा हर्ष व्हावा.

-


15 JUN 2019 AT 18:25

जसे डोळ्यांना अश्रु,
पाहूनी या ढगांना बरसताना
स्वतःला कशी मी सावरू



-


16 NOV 2018 AT 15:21

ढग दाटूनी येती ,मनात स्वप्ने रंगती...
मेघा हे डोळे तुझी वाट किती रे बघती...
नेहमीच पयोधरा तू ,असा चकवून जातो....
आयुष्याची घडी सगळी, कारे विस्कटून जातो...
काळ्या आईची लेकरे, ही धावा करती जलद...
कष्ट करतो ,घाम गाळूनी, बरस रे अंबूद...
पयोधरा ,तुच जीवन दे,वसुंधरेला दान दे...
पिके येती ,सुखही येईल ,हात दे घननीळा...
वाट बघतो अभ्र मिळू दे ,सुन्या सुन्या आभाळा...
सार्थकी लागेल जीव हा रे ,जर कृपा करशील अब्द...
शेतकरी मी हात जोडतो धाव आता निरद.....!

निलिमा ✍🏿



-