QUOTES ON #YQMARATHI

#yqmarathi quotes

Trending | Latest
29 SEP 2020 AT 18:55

*माझी १०० ओळींची मराठी कविता*

"कविता"

अशीच ही एक कविता
कदाचित माझीच ही कविता
जीवनाची ही कविता
आयुष्याची ही कविता

कुठे आहेस तू कविता
माझी होतीस का तू कविता
माझी आहेस का तू कविता
हरवलीस का तू कविता

Full poem in Caption

-


22 SEP 2020 AT 3:33

लाजमी नही है की तुम्हे आँखोसे हि देखु,
तुम्हे सोचना भी ,कोई छोटी बात नही...!

-


3 JUL 2021 AT 21:52

सतत मिठीत तू हवीशी वाटते बघ मला,
हे गोड गुपित राणी सांगू तरी कस तुला?
तुझं रूप पाहून, मज वेड लागे तुझे.
निष्पाप डोळे अन सुंदर हास्य,
उलगडू इच्छितो तुझं सगळं रहस्य.

-


30 AUG 2021 AT 14:10

जन्मदाता तुझे रे वासुदेव देवकी
गोकुळात वाजवी तो तू बासरी

जाहली यशोधा तुझी माता माऊली
साद घाली जो तो तू कृष्ण मुरारी

सखी राधा पण झाली रे आज बावरी
अकस्मात जाता ती कधी यमुनातीरी

मनमोहना धून तुझी स्पर्शे हृदयांतरी
गायी गुरांसवे नाचे पुरी गोकुळनगरी

शोभून दिसे किती मोर पंख डोयीवरी
सावळा रंग रे तुझा तू कृष्ण मनोहारी

छेडे गोपाळांसह गोपिकांना तो श्रीहरी
हरे कृष्णा साद घाली रे तुझी ही बासरी

-


16 JUL 2021 AT 7:31

आता गुंफला मनी आनंद
सरले दुःख ते भरलेले डोही
बहरले सुखाचे ते तरंग

-


30 JUN 2021 AT 8:31

शब्दांच्या खेळात
अन भावनांच्या मेळात

माणसाच्या मनात
अन हिरव्यागार वनात
बालपणीच्या आठवणी
अन आंबटगोड साठवणी

शाळेतील प्रार्थनेचा हेवा
बालसंस्कारांचा ठेवा
आठवता डोळे पाणावले
खूप काही हरवले

-


30 JAN 2019 AT 19:40

नमस्कार YQ स्नेहीजनहो!
लिहिताय ना? लिहायलाच हवं.

आम्ही आशा करतो,आपल्या आयुष्यात हा
हिवाळा छान गारवा घेऊन आला असेल आणि आता तुम्ही उबदार वसंताची आतुरतेने वाट पाहत असाल.चला,आता काही उबदार किरणांकडे वळू या.
आपल्यातील काही सुंदर आणि उत्तम अशा लिखाणाची एक सफर करूया.या प्रोफाइल वर तुम्हाला उत्तमोत्तम कविता आणि इतर लेखन वाचायला मिळेल,जे योरकोट वर प्रकाशित झालेलं असेल. इथे तुम्हाला गवसेल उत्तम साहित्य,जे वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल,असेच सुंदर लिहिण्याची.
आम्ही योरकोट वरील निवडक कोट्स,कविता आणि पोस्ट इथे शेअर करू.चला,सामील व्हा आमच्या प्रवासात, साहित्याचा खजिना शोधण्यात.आपणही आम्हाला सूचना देऊ शकता आपल्या कॉमेंट्स द्वारे, जर तुम्हाला काही सुंदर लिखाण फिचर करावेसे वाटले तर.

-


6 JUN 2021 AT 11:23

कळून ही ना, कळली मला ती
कोडी बनून, पडली मला ती

एकच प्याला, झाला आता तर
इतकी कशी, चढली मला ती

मिटता मिटं ना, सुटता सुटं ना
सवयी जशी, जडली मला ती

ती म्हणाली पुन्हा, भेटू नको, पण
स्वप्नात येऊन, धड़कली मला ती

एक उचकी ही आता, मला येत नाही
इतकी कशी, विसरली मला ती

-


10 JAN 2022 AT 19:47

तू समोर दिसावं.
अन स्वप्न हे माझं,
एकदा सत्यात उतरावं.
तुझा हात मी हाती घेवून,
असं कौतुक करावं.
ते कौतुक तू ऐकून,
कसं गोंडस हसावं.
एकमेकांत आपणं,
इतकं मग्न होऊन जावं.
सोबत जगणं असो वा नसो,
हे नातं आजीवन संलग्न रहावं.

-


18 MAY 2021 AT 19:41

माझ्या डोळ्यात तुझं प्रतिबिंब
आणि घे मला मिठीत
तुझे डोळे करून ओलेचिंब

तू ये आणि बघ
माझ्या हृदयाची धडधड
थोडं तू बोलत रहा
माझी पण ऐक बडबड

-