नको निराश होऊ तू, नको चिंता करूस तू,
नको हताश होऊ तू, नको मागे वळून पाहू तू
निरंतर पुढे पुढे चालत रहा तू,
ध्येय वाट पाहत आहे तुझी.
आपली वाट बनवत रहा तू,
निरंतर पुढे पुढे चालत रहा तू,
तुझ्या वाटेत येईल आडवे जग,
पण नको डगमगू तू, नको विचलित होऊ तू, तुझ्या पंखांनी उंचच उंच झेप घे तू, नको कशालाच घाबरू तू,
येऊदे कितीही वादळे त्याला सामोरे जा तू,
विश्वास वाढव तू, आत्मविश्वास जागव तू
चालत रहा तू चालत रहा पुढे पुढे चालत रहा. यशाच्या मार्गावर चालत रहा,
निरंतर पुढे पुढे चालत रहा तू,
निरंतर पुढे पुढे चालत रहा तू,
-