QUOTES ON #MARATHIWRITER

#marathiwriter quotes

Trending | Latest
8 NOV 2018 AT 23:13

आज पुरानी राहों से,
चलने लगा हूँ।
छुटा हुआ पिछे,
ढुँढने लगा हूँ।
अपने जो राहों से भटके थे,
उने फिर राह पर लाने लगा हूँ।
मंजिल पाने के लिए छुटे हुए,
हाथो को पकडने लगा हूँ।
जाने अनजाने मे टुटे हुए,
दिलो को मनाने लगा हूँ।
(पुरी कविता अनुशिर्षक मे पढियें)

-


4 FEB 2019 AT 13:23








..

-


3 NOV 2021 AT 13:16

येई आवाज फटाक्यांचा,
दरवळे सुगंध फराळाचा,
दिसे प्रकाश दिव्यांचा,
आला सण दिवाळीचा!

-


2 NOV 2021 AT 12:37

ती प्रेयसी माझी,
मी प्रियकर तिचा.
ती थंड गुलाबी हवा,
मी तप्त सूर्य जसा.

मी कंटाळवाणा निबंध,
ती मनमिळावू कविता.
मी तिला ऐकत धुंद,
ती माझ्यामध्ये बेधुंद!

-


1 DEC 2021 AT 18:40

दडपण मनातलं.
ओघळत्या आसवांनी,
सहजचं तराळलं!

खूप जड होतं,
माझ्या चष्म्याच ओझं.
तिच्या मना नेहमी,
मी असपष्ट पाहिलेलं!

खूप जड होतं,
माझ्या लेखणीच सामर्थ्य.
स्वतःला लिहायचा ध्यासं,
पण प्रयास जाई व्यर्थ!

-


24 NOV 2021 AT 18:54

मनातलं वादळ, आज पुन्हा इकडे आहे,
सोबतीला दिसे क्षण, होते जे गमावले!
किती काही, काही नाही, मन भीत आहे,
चेहऱ्यावरचे बघा हे, कसे स्मित हेरावले.

मला नाही फिकीर, जो वारा तिकडे वाही,
मिठीत मज घेऊन, संग उभी माझी राणी!
माझं अदृश्य वादळं, कसं दिसतं तिलाही?
घट्ट बिलगून पुसलं, माझ्या डोळ्यातलं पाणी.

-


4 AUG 2021 AT 9:59

१.आगमन

सुंदर सकाळ, भरभरून वाहनांची गर्दी, तुडुंब लोकांनी भरलेला तो रस्ता आणि त्या रस्त्यावरून हवेशी संवाद साधत इतर वाहनांसोबत स्पर्धेत धावत असलेली एक अलीशान गाडी. मागच्या सीटवर बसलेला तो मनगटावर असलेल्या घड्याळात पाहत होता, जणू तिन्ही काटे तीन दिशा दाखवायच्या प्रयत्नात आहेत. बरोबर नऊ वाजून पंधरा मिनिटे झाली. घड्याळाचा तो फिरणारा काटा, पुन्हा त्या दोन्ही काटयांशी भेट घ्यायला जात होता इतक्यात ड्रायव्हर म्हणाला
'साहेब, आपण घरी आलो!'
त्याचं घर म्हणजे श्रीमंतीचं प्रतिक. त्या भव्य बंगल्याच्या गेटसमोर आल्यावर त्याने ड्रायव्हर कडे एक छोटासा रिमोट दिला. ड्रायव्हरने रिमोटची काही बटणे दाबून क्षणार्धात तो गेट उघडला. त्यांच्या गाडीने आत प्रवेश केला.

-


8 AUG 2021 AT 13:33

३. कुटुंब

तो घराचे भव्य प्रवेशद्वार उघडून आतमध्ये गेला. ते फक्त घर नव्हे एक वेगळं जग आहे. जगातील सर्व आराम आणि जेवढं मनुष्याला काही न करता कुठेही न जाता उदरनिर्वाहासाठी आयुष्यभर पुरेल इतकं सगळं भरलेलं.
"बाबा आले आई." हे वाक्य म्हणतं एक लहान सात वर्षांची गोंडस गोरीपान मुलगी त्याच्याजवळ आली. त्याने तिला उचलून घेतलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं, "काही खाल्लं की नाही शोना?"
इतक्यात त्याची बायको तिथं आली, नवऱ्याला पाहून तिचं रूप अजून जास्त खुललं आणि आनंदाने त्याच्याकडे पाहून ती म्हणते, "तुम्ही थोडं आवरून या, मी नाश्त्याची तयारी करते." मग तो आवरून आल्यावर सगळे सकाळची न्याहारी करायला बसतात. त्याची बायको सगळ्यांना वाढते, तो म्हणतो, "तू पण बस ! शोनाला भरवताना तू ही खाऊन घे."
ती स्मित करत डोळ्यांनी त्याला होकार देते. सर्वांचं खाऊन झाल्यानंतर त्याचे आई-वडील उठून शोनाला खेळवण्यासाठी घेऊन बाहेर जातात. तो तिच्याजवळ जातो आणि हास्य करत तिच्या डोळ्यात रोखून पाहतो तशी ती लाजते आणि खाली पाहते. तो तिच्या केसांशी खेळत तिला म्हणतो, "राणी एवढे नोकर आहेत घरी, मग तू सतत काम का करते? असंच करायचं असेल तर मी ही मदत करतो उद्यापासून तुला घरच्या कामात." ती लाजून म्हणते, "इश्श...! तुम्ही पण ना...."इतक्यात त्याचा फोन वाजतो आणि तो फोनकडे पाहतो.

-


5 AUG 2021 AT 10:02

२. आशीर्वाद

स्वर्ग कोणी पाहिला तर नसेल पण स्वर्ग हा शब्द ऐकला की जे सुंदर रेखाटन मनात यावे तसं काही त्याच घर. ड्रायव्हरने आत आणून गाडी थांबवली, चटकन गाडीतून खाली उतरून पटकन गाडीचा मागचा दरवाजा उघडला.
तो गाडीतून खाली उतरला, सूट-बूट घातलेलं, चेहऱ्यावर यशप्राप्तीचं तेज असणारं सत्तावीस वर्षांचं त्याच अप्रतिम व्यक्तिमत्व. तो उभा राहिला त्याचा सूट काढत होता तोपर्यंत जशी स्वर्गात अप्सरा असावी तशी एक बावीस वर्षांची सुंदर मुलगी त्याची असिस्टंट अगदी औपचारीक वेशभूषेत तिथं जाऊन त्याचा सूट त्याच्या हातातुन घेते आणि स्मितहास्य करत म्हणते- 'तुमचं स्वागत आहे सर! सुप्रभात, आपला दिवस आंनदी जावो.'
दोघेही चालतं थोड्या अंतरावर गेल्यावर बाजूला एक छान मोठी बाग होती, तो तिथे गेला. आरामदायी खुर्चीवर त्याचे वडील बसले होते आणि एक नोकर त्यांना वर्तमानपत्र वाचून बातम्या सांगत होता. तो त्यांच्याजवळ गेला, उजव्या पायाला स्पर्श केला आणि हाताने घेतलेला तो स्पर्श अगोदर स्वतःच्या कपाळावर नंतर छातीवर ठेवला. तिथं थोड्याच अंतरावर त्याची आई बसली होती, जाऊन त्याने आईचा ही आशीर्वाद घेतला. त्याची असिस्टंट हे सगळं नेहमीप्रमाणे स्मितहास्य करत पाहत उभी होती. तो तिच्याकडे पाहत जवळ आला आणि तिला ऑफिसला जाण्याची परवानगी दिली तसाच तो पुढे घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर गेला.

-


10 AUG 2021 AT 13:09

४.सिंहासन

त्याने फोन हातात घेतला, फोनमध्ये एक संदेश झळकला. त्यामधील मजकुर पाहून त्याने तिच्याकडे पाहिले, तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने प्रेमाने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर चुंबन देवून म्हणाला, "काळजी घे, येतो मी." तिने स्मित करत डोळे झाकून त्याला परवानगी दिली.
बाहेर गाडी व चालक त्याची वाट पाहत होते. तो गाडीजवळ गेल्यावर चालकाने त्याचे स्वागत केले व त्याची परवानगी घेऊन ते दोघेही आता निघाले.
आता त्यांची गाडी शहरातील सर्वात भव्य इमारतीसमोर येऊन थांबली, जे केवळ त्याच ऑफिस नसून संपूर्ण शहराचं आकर्षण आहे. दहा वर्षांपूर्वी इथेच त्याच्या वडिलांचं लहान दुकान होतं, पण आज त्यांच्या दहा शाखांच्या आणि इतर पाच कार्यालयांचे सर्व व्यवस्थापनाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जातात.
त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि लिफ्टमध्ये जाऊन उभा राहिला इतक्यात त्याची असिसस्टंट व इतर दोन सहाय्यक जे अनुक्रमे प्रशासन विभाग प्रमुख आणि व्यवस्थापक होते त्याची परवानगी घेऊन त्याच्यासोबत लिफ्टमध्ये चढले. लिफ्ट आठव्या मजल्यावर पोहोचली. तो जाऊन या सर्व कार्यभाराच्या जबाबदारीवर म्हणजेच त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला. त्या निर्जीव खुर्चीमध्ये जणू प्रचंड ऊर्जा संचारली, असे तिथे उपस्थित त्याच्या सहाय्यकांना वाटले.

-