QUOTES ON #MARATHIKAVITA

#marathikavita quotes

Trending | Latest
25 JAN 2019 AT 18:28

दाटलेल्या मनाला सावरुन
आजही निष्ठेने जगते ती..

जनव्यापी तिरस्कृत स्वभावात
स्वतःचे सामर्थ्य बघते ती..

रोज बघणाऱ्या घृणास्पद
नजरेला स्वतः अनुभवते ती..

या असुरक्षित जगात
टीकेत न्हाहते ती...

काय रे तिचा दोष, कुणाची
बहिण, आई ,पत्नी, मुलगी ती..

एक निर्दोष स्त्री तरी
बलात्काराचे रूप बघते ती..

खरचं स्वतंत्र आहे का ती...?

-


4 FEB 2019 AT 13:23








..

-


1 MAY 2019 AT 19:23

क्षणांची ओळख

ना ओळख ना पाळख...
स्व:ताची की क्षणांची?
निखळत्या त्या श्वासांची
की चिंब भिजलेल्या व्रणाची
आहे का ओळख त्या क्षणांची?

भुतकाळात सलनाऱ्या मनाची
चिंतातुर अश्या भविष्याची
यात वर्तमानाच्या झालेल्या भस्माची
आहे का ओळख तुला स्व:ताची?

मनमर्जी बागडणाऱ्या स्वतःची
निरागस अश्या हृदयाची
खरच...
आहे का ओळख तुला?

-


3 NOV 2021 AT 13:16

येई आवाज फटाक्यांचा,
दरवळे सुगंध फराळाचा,
दिसे प्रकाश दिव्यांचा,
आला सण दिवाळीचा!

-


3 JUL 2021 AT 0:38

' पाऊस आणि तिची भेट '



( संपूर्ण रचना कॅप्शन मध्ये )

-


2 JUN 2021 AT 20:11

शब्दांच्या पलीकडले ......
शब्दांच्या पलीकडले तुझ्या डोळ्यातून उमगले
पावसातलें इंद्रधनु. तुझ्या नजरेत च गवसले
तुझे डोळे जणू माझे शब्द चं होऊन बसले
उमलणाऱ्या भावनाना माझ्या ते नकळत फुलवून गेले शब्दांच्या पलीकडले .....
तुझे डोळे जणू माझे विश्र्व च होऊन बसले
प्रेमाने तुझीया माझे लक्ष दीप च उजळून गेले
शब्दांच्या पलीकडले .....
शब्दावाचून मजला प्रीतीचे रहस्य उलगडले
प्रेमाची साद मजला तुझे डोळेच देऊन गेले
शब्दांच्या पलीकडले .....

-



माय मला माेकळा श्वास घ्यायचा गं
मला येऊ देशील का गं या जगात
माय मला खेळायचयं, बागडायचयं
या तुझ्या अंगणातलं कळी व्हायचयं

( खाली वाचा..धन्यवाद..)

-


12 AUG 2020 AT 15:03

विचारांच्या गर्तेत अडकलेल्या मनाला,
सांभाळणं आता मला जमत नाही...

वाहत जातो विचारांसवे दूर वर,
विचारातून पोहण मला जमत नाही...

बुध्दी आणि मन दोहोंचे वेगवेगळे विचारांचे,
कंगोरे सहन करणे आता मला जमत नाही...

सकारात्मक नकारात्मक विचारांच्या वादात,
मज ला अडकणे आताशा जमत नाही...

कधी कधी विचारांचा ही विचार करावा,
हा विचार करणे देखील मला जमत नाही...

-


29 JUN 2021 AT 12:25

मोहक गुलाब जसं
दवबिंदूनी भिजलेलं
ओलाव्यात थिजलेलं

जशी पावसाची धार
येई मातीचा सुवास
श्वास होई थंडगार

-


24 APR 2020 AT 13:20

आधुनिक युगात नव्वदीच्या दशकाची झलक जपून ठेवायला,
घराचा कारभार घरातील ज्येष्ठ व्यक्तीनेच हाकायला,
आई-वडिलांची श्रावणबाळ बनून सेवा करायला,
मोठ्या माणसांचा आदर करून संस्कार जपायला.

दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणाने करायला,
संध्याकाळी घरात अंगत- पंगत जेवणाचा घाट घालायला,
आपल्या मुलांना आपल्या काळातील गोट्या,
विटी-दांडू, सुरपारंब्यासारखे खेळ शिकवायला.

चप्पल, बूट न घालता कधीतरी जमीनीवर अनवाणीच चालायला,
मोबाईल बाजूला सारून सगळ्यांसोबत गप्पांची मैफिल रंगवायला,
सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी मिळून एकत्र टीव्ही पाहायला,
सणवार सगळ्यांनी एकत्रितपणे साजरे करायला.


काळ्या आईच्या दर्शनाला कधीतरी शेतात जायला,
आताच्या काळात जगताना जुना काळ ही आपल्यात जिवंत ठेवायला,
धकाधकीच्या जीवनात झाडांसारखा मोकळा श्वास घेयला,
जमतंय का बघा यातलं आपल्याला काहीतरी करायला.

- Sojar Bongale

-