मराठी असे अमुची मायबोली
तुच आमची अस्मिता, अन् तूच ज्ञानियांची वाली
निनादली तू वासुदेवच्या डफळीने,
गायिले तुझ्यावर शाहिरांनी पोवडे.
देश प्रदेश जिकडे तिकडे,
वाजती तूझ्या थोरवीचे चौघडे.
तुझ्याच शब्दकणांनी पुर्ण होई संतांचे अभंग,
शब्द शब्द ऐकूनी कर्ण होई तृप्त अन् मन होई दंग.
कितीक ताईंनी आईंनी म्हणली जात्यावर ओवी,
अशा शब्दरसाच्या गोडीने मूले पाखरे ऐकूनी गोळा होई.
शिवरायांनी राजमुद्रेवर दिला तुला पहिला मान,
तुच आहे अमुची जननी, अन् तूच या मूलूखाची शान.
तुझ्यात बोलण्याचा, तुझ्यात असण्याचा आहे मज गर्व,
थोर, मोठे, लहाणे तुझा अभिमान बाळगते सर्व.
-