आम्ही वेगळ्या मुली,
आम्ही नाही जुमानत दिसण्याला,
कधी कधी वाटतं आपणही सुंदर दिसावं,
पण आम्ही प्राधान्य देतो मनाच्या सुंदरतेला,
आमची स्वप्नही कुणी पाहातं का?
आम्ही स्पष्ट नाकारतो क्षणिकतेला,
कधी कधी वाटतं नवीन जगात आपणही समरसावं,
पण आम्ही प्राधान्य देतो सुंदर भविष्याला,
आम्ही कुणाला आकर्षक वाटतो का?
आम्ही दाबुन टाकतो अगतिकतेला,
आणि ताठ मानेनं वावरतो एका सुंदर चारित्र्यासह,
पण आम्ही प्राधान्य देतो मजबुतीला,
आम्हीही कुणाची पहीली आवड ठरू का?
आम्ही नाही जुमानत चकाचक जगाला,
कधी कधी वाटतं आपणही खर्चावी एक पावली जास्तीची,
पण आम्ही प्राधान्य देतो तडजोडीला,
आम्हालाही पॉलिश केलेल्या चेहऱ्या पुढे प्राधान्य मिळेल का?
-