नवीन होते वागणे
आज तिचे बघणे
राहून गेले ओठात
खूप काही सांगणे
पाहून नजरा नजर
नाराज ती भासली
जराही ना हासली
शंका मनी वाटली
सहजपणे विचारले
काय आहे ते घडले
थांबली ना बोलली
सारी गुपिते खोलली
लग्न होते तिचे ठरले
सावरत मी स्वतःला
सर्वस्वच होते हारले
लपवत,अश्रू येताना
पाहिले मी पावलांना
ठसे सोडून जाताना....
-