QUOTES ON #COLLAB0408

#collab0408 quotes

Trending | Latest
5 AUG 2018 AT 20:10

तुझ्या असण्याने आहे आनंद

-


4 AUG 2018 AT 18:40

तु जग माझे जग नाही तुझ्याविना....
प्रीतपहाट तु श्रुंगार सुख नाही तुझ्याविना....
मधुर जीवनी तु संगीत गीत नाही तुझ्यविना....
सार्थ स्वार्थ माझ्यात नाही पूर्णतः तुझ्याविना....

-


4 AUG 2018 AT 18:18

तू भेटावी पुन्हा पुन्हा
तू भेटलीस की वाटत जगाव प्रत्येक क्षनाला
तुझे हात कायम हवे अस्तात माझ्या हातांना
तू अशी का निघुन गेलीस. अजूनही विश्वास बसेना
जगण्याला अर्थच राहिला नाही तुझ्याविना...

-


4 AUG 2018 AT 17:46

जिथे ही जातो सोबती पाहीजे तु ग मला ,
तुला इजा होण्याचा विचारही घाबरवितो ग मला ,
इतकेच नाही तर तुला पाहण्याकरिता रोज
सकाळी धाव घेउनी येणे फाट्यावरी आठवते ग मला....

-


4 AUG 2018 AT 17:56

स्वप्नांना ही अर्थ नाही तुझ्याविना .....
पावसाला ही अर्थ नाही तुझ्या विना .....
आठवणीना ही अर्थ नाही तुझ्या विना ......
आयुष्याला ही अर्थ नाही तुझ्या विना ......

-



जगण्याला अर्थ नाही तुझ्याविना
तूच आहेस प्राण माझा
तूच आहेस श्वास माझा
तुझ्या सोबतीने मी किती
खुश राहायची
मनसोक्त जगायची अन मनसोक्त राहायची
सुख दुःख दोघे मिळून सोसायचो
प्रत्येक वळणावर तुझी साथ असायची
ठेच लागता तूच सावरायचा
मन उदास झाले की तूच आवरायचा
झाला च आपला वाद कधी
तर तूच समजूत काढायचा
गेलास कुठे बाहेर की
प्रत्येक क्षणी तूच आठवायचा
पण
आता ना साथ कुणाची ना आता विश्वास
गेला असा सोडुनी बेभान झाली मी आज
ना जगण्याची आस ना जगण्याचा ध्यास
आयुष्यातील रंग सारे उडून गेले आज
सौ.मनोरमा मुसळे

-


4 AUG 2018 AT 19:01

क्षण हे निरर्थक तुझ्याविना ,
शब्द हे निशब्द आहे तुझ्याविना ,
आनंद ही नकोसा आहे तुझ्याविना ,
प्राण हा निष्प्राण आहे तुझ्याविना ,
जीवन हे अर्थहीन आहे तुझ्याविना . . .

-


4 AUG 2018 AT 19:31

तु नसलास तरीही तुझ्या असण्याचा..
भास हवा होता मला..
म्हणजे माझ्या जगण्याला अर्थ होता..
तु असतांना..!!

-


4 AUG 2018 AT 17:37

इतक्या कमी वेळात मला आपलं करून दाखवलंस
सवयी, स्वभाव आणि विचार माझे बदलून दाखवलंस
प्रत्येक वेळी मला सांभाळून घेतलंस
चिडलो रुसलो तरी समजावून सांगितलंस,
घरच्यांसाठी मात्र लांब तू गेलीस,
एकटा पडू नये म्हणून आठवणी देऊन गेलीस।।
तरी..... तरी पण वाटत रे कि .
जगण्याला अर्थ नाही तुझ्याविना..vj

-


4 AUG 2018 AT 23:41

अरे.... मनमोहना
काय सांगू तू माझा
कोणता छंद आहे
तू सुगंध आहे
श्वासाचा गंध आहे

काय सांगू तू माझा
कोणता रंग आहे
तू अंतरंग आहे
मनाचा सप्तरंग आहे

काय सांगू तू माझा
कोणता ध्यास आहे
तू विश्वास आहे
आत्मविश्वास आहे

काय सांगू तू माझा
कोणता भास आहे
तू वेडी आस आहे
प्रत्येक श्वासात आहे

तू रंग,तू छंद, तू गंध
तू श्वास, तू विश्वास
तू सा-या शब्दांचा अर्थ
तुझ्याविणा सारे व्यर्थ

रे....मनमोहना

-