QUOTES ON #SHREYA

#shreya quotes

Trending | Latest
5 JUN 2020 AT 23:48

⛳🚩🚩😎🚩🚩⛳
कपाळी चंद्रकोर शोभते भारी,
आम्हा मराठ्यांची ही तऱ्हाच न्यारी
भगवा झळकतो आमुच्या दारी
कणा-कणांत राजे वास करी.

आपुला राजा ३३ कोटींत भारी
जगात त्यांचे लाखो पुजारी,
देव रुपी जन्म घेतला भूवरी
छत्रपती पदवीचे ते मानकरी.

राज्याभिषेकाची रोषणाई रायगडी
मानाचा मुजरा त्या पुढारी,
होती लोकशाहीची हि सुरुवात खरी
ह्रुदयात कायमची छाप टाकणारी.

-



दोस्तों के दिलों में रहने के लिए,
इजाजत नहीं मांगी जाती..
ये तो वो जगह है...
जहां बस कब्जे किए जाते हैं !!
😄😄😄

-


5 JUN 2020 AT 22:44

गुलाबी थंडी 🤗
❤️❤️❤️❤️❤️❤️
पुरे कर ना आता
गरम श्वासांची ऊब देणं,
दबका होतो श्वास माझा
होऊन जातं जीवघेणं

वाढत्या थंडीसोबत
हृदय ही स्पर्धा करते,
दोघांच्या या स्पर्धेत
माझी तारांबळ उडते.

असल्या बिकट अवस्थेत
भारी पडतो तुझ्या नजरेचा वार,
मला तर नाही जमणार
तूच घे ना माघार.

दोघांच्या मिलनाला आपल्या
गुलाबी थंडीची हजेरी
तिच्यापेक्षा आधी मी
वेडी, तुला बिलगणारी

-


13 OCT 2020 AT 1:07

आपल्या दोघांच्या त्या गोड आठवणी
मनात जपून ठेऊयात ना...
कोणालाच कळू नयेत म्हणून
गुपचूप लपवून ठेवूयात ना...
कोणी विचारलं जरी
तरी न समजल्याचा बहाणा करूयात ना...
सगळं समजूनही आपण
लोकांना वेड्यात काढुयात ना...
न बोलता एकमेकांची दुःख
समजून घेऊयात ना...
सुखाची आपल्या वाटणी
दोघांमध्ये करूयात ना...
राग जरी आला कधी
तरी आपलं समजून माफ करूयात ना...
जेव्हा कोणीच नसेल आपलं
तेव्हा एकमेकांचे होऊयात ना...

-


5 JUN 2020 AT 13:16

रेशीमगाठी
❤️❤️❤️❤️❤️❤️
चाहूल माझ्या मनाची
तुझ्या मनाला लागे,
नकळत अतूट झाले
ऋणानुबंधाचे धागे.

अद्भुत प्रेमाच्या दुनियेत
पाऊल माझे पडले,
ज्याप्रमाणे हवं होतं
सगळं त्याप्रमाणे घडले.

रुसवे फुगवे आपले आता
वाटू लागलेत गोड,
आयुष्यभराच्या अशाच गोड भांडणाला
हविये तुझ्याच साथीची जोड.

तुझी नेहमी एकच तक्रार असते
तू कधीच मला समजून घेत नाहीस,
पण तूही एक Secret लक्षात ठेव
रागावलास ना की तू चांगला दिसत नाहीस.

भावी आयुष्यातील विचारांची
गर्दी मनात साठते,
होईल ना रे सगळं ठीक?
जाम भीती वाटते😐

अतिशयोक्ती म्हणून नाही
पण, खरंच...काहीही करेन तुझ्यासाठी,
फक्त देवाकडे हिच प्रार्थना
जुळून याव्यात रेशीमगाठी.

-


23 JUL 2020 AT 1:00

आजकाल खूपच कमी लोक
प्रामाणिकपणे वागतात,
नाहीतर Keep It Real म्हणणारेच
दोन चेहरे घेऊन जगतात.

-


18 SEP 2020 AT 1:07

We don't get what we "want",
We get what we "Deserve."

-


18 JUL 2020 AT 23:41

❤️सरकार❤️

लॉकडाऊन मध्ये भेटायची काय होती एवढी घाई
भेटायला यायला केली होती ना मी मनाई,
रागवल्यावर म्हणता :
तुम्हाला न भेटता कसा राहू मी वेडू बाई
मास्क बांधून आलोय ना...
मग कशाला ही इतराई.

कशी-बशी समजूत घालून
नुसत हसवायचं असतं मला,
मग उगीच गाल ओढत म्हणायचं
बघा, कसा हा गालांचा फुगा फुगलेला,

नाक मुरडत मुद्दाम मी ही
तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं,
आत्ता smile येते बघा म्हणत
लपवून ठेवलेलं चॉकलेट दाखवायचं.

नीट रागावू ही देत नाही मला
काय बुवा, तुमचा हा अत्याचार,
लगबगीने मिठीत घेऊन म्हणायचं
अहो,तुम्हीच तर आमचं सरकार.

-


4 APR 2021 AT 20:05

जिंदगी जीने और बिताने में बस नज़रिया का फर्क़ होता हैं 🌸

-


7 APR 2021 AT 23:32

Do hard work as much as you can now.
Because your hard work will pay off in future giving you a bright future. ✨

-