हुए रूसवा मोहब्बत में, सब सौप कर इस कदर
अब सजदे भी करते हैं सौ बार सोच कर-
कधी खरा
कधी खोटा
कधी फसवा
तरी हवा वाटे
रुसवा...
राग लटका
मनाला फटका
मनवावे प्रेमाने
लगेच जातो
हा रुसवा-
रुसवा तुझा हा का कळेना
का अबोला उगा सांगना
का छाळशी मला बोल
जराशे बोबडे बोल बोल
काय हवे सांग ये ना जवळ
रागाला आता होऊ दे मावळ
हसना जरा गालात गोड गोड
हा फुगा फुगलेला जरा फोड
कुणी काढली बाळाची खोड
मी करते त्याची खोडी मोड
खाऊ देऊ की खेळणी काही
ये ना सोनुल्या मजपाशी बोल-
रुसावी तू नि मी तुला मनवावे
असेच खेळ रोज आपल्यात चालावे
कधी समुद्र किनारी कधी परस बागी
प्रत्येक क्षण मिठीत एकमेकांच्या घालवावे...
असला जरी रुसवा फुगवा
अश्रू विरहाचे कधीच त्यात नसावे
असावी वाहती प्रेमाची सरिता
त्या सरितेला वाहण्याचे बंधन नसावे...
यावा कधी कधी दुरावाही
पण त्यात काटे दुःखाचे नसावे
त्या काट्यातही दुःखाच्या
उमललेले एक गोंडस फूल असावे...
रुसव्या फुगव्याच्या आधारावरच
जीवनाचे आपल्या सार आहे
कधी भेटू कधी विलग होऊ
यातच आपले प्रेम अपरंपार आहे...-
क्षितीजा पल्याडचा
मृगजळ जसा फसवा
त्यासमच सख्या तुझा
प्रांजळसा रुसवा......
न सुचणारी ओळ हटटी
कल्पनेशीही करती कटटी
तसाच तुझा राग आबोली
रुसव्याची तो भाषा बोली....
कातरवेळी मन अधिरे रे
भावबिलोरी चंदण गहरे
नखशिखांत त्या रूसव्यावरही
प्रेम करावे अंध नी बहिरे.....
संसाराचा गोडसा मेळ
कुणी म्हणे त्यास रे खेळ
त्या खेळातील माझा मितवा
त्याहुनी सुंदर त्याचा रुसवा....०८:१२:२०१९✍️-
वाटे "रुसवा" हा जरी गोड शब्द
तरी अंतर मनास करी विचलित..
का?नको,सोड न,या कोड्यांच्या
उत्तरासाठी चेहरा दिसे प्रश्नांकित..
कधी कधी हाच एकमेव रुसवा
दोन जीवांना प्रेमात कैद करतो..
तर काही वेळा अघटित घडवून
त्याचे रूप तो वेगळेच दाखवतो..
रुसवा असावा काही क्षणांचा
दिसता,बोलता पटकन मिटावा..
झालेले विसरून जावे सर्व आणि
रुसव्यातील "रु" काढून हसावा..-
रुसली जेव्हा "सती",
शिवाला "स्त्री हट्ट" उमजला
तो "बाल हट्ट" समजूनी
त्याने स्वतःत "नट" उपजला..
सुटला रुसवा आणि
मनमोकळी हसली सती..
सतीचा प्रितितूनी, अशी झाली,
"नटराजा"ची निर्मिती..-