जीवन...
एक आहे आठवण अशी
जिथे त्या उत्तुंग वटवृक्षालाही गरज भासली
अहो केली मदत त्याने
हिंमत त्याला दिली...
आजही येतो असा क्षण
जिथे माणुस माणसाला विसरतो
अहो जगतो पुन्हा जिवन त्या वाटेवर
पण शेवटी तो त्या वाटेलाच विसरतो..
गायीला पाहिले तिथे त्या
जीने त्या वासरला वाढवले
पण काय केलं त्यांनी नजर त्यांच्या मायेला लागली
तोडले नाते त्यांचे लोकांनी वेगळे त्यांना केले..
असो बहू पर्याय ही
शेवटी ज्याने तुला सावरले
एक शून्य होता तु
तुला त्या शून्यातून नवी दिशा दिली...-
माझ्या महाराष्ट्राची गोष्टच न्यारी.
प्रत्येक गोष्टीत राजकारण जोडून,
जो तो प्रकाशझोतात राहायला बघतो भारी.
प्रसंग कुठलाही असो,कसाही असो,
ह्यांना काही गांभीर्य नसते,
ह्यांना फक्त राजकारण करायचे असते,
भले राजकारणाशी त्याचे काही संदर्भ नसते.-
राजकारणात येऊन समाजकार्य
करणारे फारच कमी आहेत,
मतांसाठी लाचारी करणारेच
इथे जास्त आहेत...!!!
-
उन का जो फ़र्ज़ है वो अहल-ए-सियासत जानें.
मेरा पैग़ाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे.
त्यांचे कर्तव्य ते जाणोत राजधुरंधर
माझा संदेश प्रेम- पोहोचू देत जगभर
मूळ उर्दू शेर: जिगर मुरादाबादी
मराठी भाषांतर: प्रमोद (पीडी) देशपांडे-
एकाच माळेचे सर्व मणी...
कुरघोडीच्या राजकारणात
कोण कोणावर कधी घसरेल काही भरवसा नाही
अन् कालचा मित्र आज असेल असंही काही नाही..!!
सकाळी उगवणारा नारायण सायंकाळी मावळणार हे नक्की
एकाच माळेचे सर्व मणी ही म्हण आहे तितकीच पक्की..!!
सुपातल्यांनी जात्यातल्यांना उगाच नावे ठेवू नयेत
भरडणार मात्र दोघेही हे सुज्ञास सांगावे लागत नाही
अन मूर्खांच्या बोलण्यात तसाही अर्थ नसतो काही..!!
उंटावरच्या शहाण्यांचे दिखाव्यासाठीच असते
बोलघेवडे धडपडणे..
मान कापलेल्या कोंबडीचे जसे केविलवाणे फडफडणे..!!
यत्किंचित लोण्यावरून
आपापसात भांडत राहतात सत्तेचे बोके वाटणीवरून..
अन् माकड पळवते सारे लोणी
कधी नगरसेवक, कधी आमदार तर कधी खासदार बनून..!!-
राजे यावे पुन्हा एकदा जन्मा
पहावा असा चाललाय राजकारण्यांचा धंदा
म्हणे लोकशाही फक्त मतदानापुरती
निवडून येता सारे आपलीच पोटे भरती
जनता पारखी सुखसोयींना
यांची नातेवाईक झोपाळा झुलती
न्यायव्यवस्था तर इतकी आळशी
आज गुनहा केलेल्यालांना न जानो शिक्षा किती वर्षांनी
देशात आपल्या होतात बलात्कार त्यांना दयेचा अर्ज करण्याची मुभा तो म्हणे अजान होता
गड किल्ल्यांची लागलिये वाट संवर्धन सोडून रमलेत पुतळे उभारण्यात
शिक्षणाचा तर बट्ट्याबोळ कधी काय तर कधी काय
काय असेल नविन पिढीच भविष्य काय माहीत
धर्मनिरपेक्षता नुसती नावाला होता जातिय दंगे
कोरोना काळात ना जानो किती नाहक गेलेत बळी भ्रष्टाचार तर यांचा जणू जावई
जनतेसाठी सारे नियम आणि हे वागती नियमाबाहेर
मढयाच्या टाळूवरच लोणी पण सोडीत नाही
दिवस यांचा सरतो एकमेकांची उणीदुणी काढणयात
यावे आपण शस्त्र छाटावं एकएकाच मुंडक
गद्दार तर भरपुर इथे हत्तीच्या पायाखाली दयावे त्यांना नाही तर कडेलोट...
व्हावा पुन्हा नव्याने स्वराज्याचा उदय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
— % &-
सारं काही पैश्यांत मोजावं,इतकं स्वस्त नाही
ओंजळीतल्या फुलांचे सुगंधरहित असणे, रास्त नाही
पटलेल्या गोष्टींचा तिटकारा करीत,उगीचच
न पटणाऱ्या गोष्टीत गुंतणे,मला पटत नाही
जे मुळात असेल ते ,सिद्ध करणेच कशाला
खोट्या, फसव्या हिशोबात अडकणे मान्य नाही
सोडून सोपा मार्ग, शिरायचंच का वाकड्यात
असे टोमण्यात बोलणे ,मनास रुचत नाही
भवती निरागस नात्यांचा असतांना गराडा
राजकारणी मैफिलीत हिंडणे मज आवडत नाही..
- चित्रा पगारे
-
पोटातल्या आगी दडपल्या ..🔥
लोभी लांडग्यांच्या भुकांनी ...🤬
कित्येक हक्कदार डावललेत हो..✨
या शुभ्र कापडातल्या लोकांनी...💥⚡⚡
✍🏻कु.प्रतिक्षा अलका भगवान जाधव (अलकनंदिनी ❣️)-
पोटापाण्याचे प्रश्न सोडून
भलत्याच मुद्द्यावर पेटून उठलेत
का राजकारणी पुन्हा एकदा
सामान्यांच्या जीवावर उठलेत-