15 JUL 2019 AT 23:24

गुरु म्हणजे नक्की कोण...?

आई बाबांच्या रूपात मला पहिले गुरु भेटले...
तर दुसरे गुरुपद मात्र त्या शिक्षकांनी भरून काढले...
गुरु मायेची हाक असावेत...
गुरु प्रेमाचा धाक असावेत...
ज्यांच्या संस्कारानी आजपर्यंत योग्य पदवी गाठली...
मायेची अन संस्कारांची शिदोरी त्यांनी जन्मताच स्मरणात टाकली...
गुरुविना योग्य ज्ञान सहज प्राप्त होत नाही...
अन एकदा संस्कार मिटले कि नसतो दुसरा पर्याय काही...
त्यांचे सदविचार मात्र कायम स्मरणात एकरूप होइल...
गुरूंची महती मात्र नेहमी विचारात संलग्न राहील...

- ऋतुजा कुडतरकर..✍️