Pravin Randive   (प्रवीण रणदिवे Jâäñ)
629 Followers · 929 Following

प्रविण रणदिवे
Joined 19 October 2017


प्रविण रणदिवे
Joined 19 October 2017
12 NOV 2023 AT 12:35

ज्ञानाचा दीप उजळू दे,
विवेकाचा प्रकाश पसरू दे,
माणूसकीच्या लखलखाटाने,
भवताल सारे प्रसन्न होऊ दे!

सहिष्णूतेचे अत्तर लेवून
समतेचा अन् बंधुतेचा सुगंध घेऊन
आसमंत सर्वांचा निरभ्र फुलू दे!

नीतीचे गोडवे गाताना
अनीतीवर प्रहार करण्याची निर्भयता
सकलांच्या अंगी येऊ दे!

पर्यावरणपूरक दीपोत्सवाचे
विवेकी समाजभान
मनामनात रुजू दे!

दीपावलीच्या मन:पूर्वक सदिच्छा!

-


12 NOV 2023 AT 9:27

ईडा पीड टाळो
बळीच राज्य येवो ..


दिवाळीच्या सर्वांना
खूप शुभेच्छा ..

-


4 NOV 2022 AT 22:10

इतका वेळ गालाशी लगट करणारी
केसांची बट कानाच्या मागे सारत
ती उत्तरली
अह्.. काय बोललात..??
आणि मग जगाचाच विसर पडला.

-


30 SEP 2022 AT 12:13

एक कवी त्याच जखमेला
पुन्हा पुन्हा छळत होता
का तर म्हणे त्या शब्दाना
बाजारभाव मिळत होता

- सुहास

-


28 SEP 2022 AT 10:15

तिच्या साजऱ्या सौन्दर्याने
एक नजर तिखट व्याली...
तिला झालेल्या वेदनेने
एक जखम इथेही झाली...

- सुहास

-


16 SEP 2022 AT 13:01

शांत जरी भासतेस
शांत जरी दिसतेस
मनात तूझ्या ऐक वादळ दडलंय..
खोडसळ तुझ्या डोळ्यांनीच
माझ्यापाशी हे गुपित फोडलंय..

-


25 JUN 2022 AT 12:17

स्पर्श केलास तू जीवनाला असा
बघ अशी जिंदगी अत्तर जाहली
तळ्याकाठची भेट ती कशी
पाहताना सखे सांज हि थांबली..

-


18 FEB 2022 AT 11:27

❣️❣️
आज तू येणार म्हणून
मन कसं बावरलंय
कसं सांगू तुला
मी त्याला कसं आवरलंय
किती त्रासात काढले दिवस
निशू तुझ्या आठवणीत
कितीदा मन भरून आलं
आपल्या प्रेमाच्या साठवणीत..
🥰🥰— % &

-


9 FEB 2022 AT 11:42

दिसणं अन् हसणं तर सोडाच
तीच रुसणं सुद्धा गोड आहे
चॉकलेट वैगरे काही नाही ओ
तिच्या ओठांच्या गोडी पुढे..— % &

-


3 FEB 2022 AT 10:34

तूझ्या श्वासांचा भास होतो
आणि माझा..
श्वास अडकतो श्वासात,
किती दाहकता आहे
बघ ना तूझ्या भासात..— % &

-


Fetching Pravin Randive Quotes