तू लाजून थोडं सखे
सावरून केस सखे,
माझ्या प्रेमाचा थोडा
रंग लावून घे सखे..
तू पाहून थोडं सखे
तू धावून थोडं सखे
प्रेमात तुझ्या मला
थोडं रंगवून दे सखे..
-प्रभू♥️
-
एक नजरा नजर अशी व्हावी
मुकी भाषा बोलून जावी ,
लाजेनं तुझी नजर झुकावी
आणि माझी नजर वेडी व्हावी...!!
-प्रभाकर सानप-
अदांवर तुझ्या त्या 😍😍
मी किती वेळा फिदा व्हावं
खणखाणाव्या बांगड्या तुझ्या
मी पुन्हा एकदा घायाळ व्हावं..!!❤️❤️
-प्रभाकर सानप❤️-
मनाच्या जखमेतून
जसं रक्त येत नाही ,
शब्दांचेही काटे तसे
दिसून येत नाही...!!
-प्रभाकर सानप-
नाचली माझी लेखणी
कोऱ्या कोऱ्या कागदावर ,
तयार होण्यास कविता
भार दिला शब्दांवर...!!
-प्रभाकर सानप.
-
शब्दाळून गेलं मन
लेखणी रंगात आली ,
कागदावरती डाग पडला
अन कविता माझी झाली...!!
-प्रभाकर सानप.
-
चलो थोडे पैसे कमा लेते है....प्यार भी तो खरीदना है,,😎
सुना है पैसो से ज्यादा मिलता है🤔
-
आई , आई एक
आवाज घुमत होता ,
मिटला होता श्वास तरी
तिला पान्हा फुटत होता...!!
-प्रभाकर सानप
-
लपवूनी चेहरा लाजरा
केस अशी ही सावरते ,
गुंतला हात हाती माझ्या
म्हणून उगीच मनी बावरते..!!
-प्रभाकर सानप-
तुझ्याशी बोलणं जरी बंद झालं असलं तरी
तुझ्या आवाजाचा भास आजही होतो मला...💕💕-