पहिल्यांदा पाहून वाटल नव्हत लग्नाच्या बंधनात जोडल्या जाव,
बावीस वर्षानी भेटलेल्या मुलाने आयुष्य बदलून टाकले नवरा हा असाच असतो काय?
तो कितीही रागावला,चिडला तोच मायेने जवळ घेतो,
नवरा हा असाच असतो काय?
माझी पुर्ण परिस्थिती जाणून तो सोबत नेहमीच खंबीरपणे उभा असतो,
नवरा हा असाच असतो काय?
माझ्या सोबत तो आईची ही समजूत काढतो, आई चिंतेत असली की तिलाही बोलुन धिर देतो,
नवरा हा असाच असतो काय?
मी चुकले, रागावले की न रागवता समजून सागतो,
नवरा हा असाच असतो काय?
खूप कमी मिळतात ह्या जगात मरेपर्यंत साथ देईल ते बोलणारे व ते वाक्य पूर्ण करून दाखवणारे आणि तो म्हणजे माझा नवरा
नवरा हा असाच असतो काय?
- निकीता गायकी
-