ना. सा.   (© नासा येवतीकर, धर्माबाद)
230 Followers · 197 Following

read more
Joined 28 July 2017


read more
Joined 28 July 2017
2 JAN 2022 AT 8:25


कवीला देती हिंमत
हीच शब्दांची किंमत

-


18 NOV 2021 AT 20:40

तुला आठवतंय का माझी नि तुझी
पहिली भेट कशी झाली ?
नसेल आठवत तर डोक्याला जरा ताण दे
ते पावसाळ्याचे दिवस आभाळ भरून आलेलं
छातीत पुस्तकं कोंबून तू रस्त्यावर जात होतीस
त्याच वेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला
तुझी भिरभिरती नजर माझ्यावर पडली कारण
माझ्याकडे छत्री होती
क्षणाचाही विचार न करता माझी छत्री दिली तुला
पुस्तकं भिजू नये नि तू पण
मी मात्र पावसात भिजत चाललो तुझ्या सोबतीने
मला नव्हती काळजी कशाची
थोड्या वेळाने पाऊस थांबला माझी छत्री परत मिळाली
सोबत थँक्स चे दोन शब्द ही
मी अजूनही विसरलो नाही
आपली ही पहिली भेट
कदाचित तू विसरली असशील

-


17 NOV 2021 AT 19:02

वेदना मनातल्या ओठावर येऊ दे
डोळ्यांत साचलेले अश्रू गळू दे
डांबून ठेवू नको दुःखी प्रसंगांना
जिवलग मित्रांना मोकळं सांगून दे

सुख वाटल्याने वाढत राहतात
दुःख सांगितल्याने कमी होतात
एकांतवासात असा लपू नको
चारचौघाना तुझा त्रास कळू दे

-


14 NOV 2021 AT 8:32

🌼 ★ 🌸 विचारधारा 🌻 ★ 🌺

समाजात आपला सम्मान व्हावा असे वाटत असेल तर आपल्या जवळ ज्ञान असले पाहिजे. ज्ञान मिळविण्यासाठी स्वतः जवळ श्रध्दा असली पाहिजे. श्रध्देशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञानामुळे आपल्या अंगी नम्रता आली की समाजात मान मिळतो. आपली योग्यता आपल्या जवळ असलेल्या ज्ञाना वरुन कळते, त्यावरूनच समाजात स्थान मिळते. वरवरचे ज्ञान आज न उद्या उघड होते. त्यामुळे श्रध्दापूर्वक सराव केले तर सखोल ज्ञान मिळविता येते.

📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769

-


12 NOV 2021 AT 10:59

*🌼🌸 विचारधारा 🌻🌺*
माणसाच्या जीवनात दोन गोष्टी अत्यंत त्रासदायक असतात एक म्हणजे नशीब चांगले असावे आणि वेळेच्या पूर्वी सर्व काही तात्काळ मिळावे असे वाटणे. नशिबात असलेली गोष्ट कधी ना कधी मिळणार म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही, तर त्यासाठी अथक प्रयत्न करणे आवश्यक आहे. जे नेहमी प्रयत्न करतात त्यांना हमखास यश मिळते आणि वेळेवर मिळते, हे मात्र खरे आहे. त्यासाठी कधी कधी प्रतिक्षा करावी लागते आणि त्याचे फळ निश्चितपणे चांगले मिळते.

📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769

-


11 NOV 2021 AT 8:02

•••••• विचारधारा ••••••

भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत जीवन चांगल्याप्रकारे यशस्वी करता येते.
पण काही लोक नेमके याच ठिकाणी चूकताना दिसतात. भविष्य पाहणा-या लोकांवर विश्वास ठेऊन, आपले जीवन घडवण्यासाठी त्याच्यासमोर हात दाखवतात आणि अंधश्रध्देला बळी पडतात. असं जर हात दाखवून आपले भविष्य घडत असेल तर काहीच काम न करता नशिब बदलले असते. पण तसे काही घडत नाही.
तेच आपले हात चांगल्या कामासाठी सदैव पुढे केले तर नक्कीच चांगल्याप्रकारे आयुष्य बदलण्यास संधी मिळेल.

📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••

-


10 NOV 2021 AT 8:32

•••• आजची विचारधारा ••••

कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते.
पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.

📝 - नागोराव सा. येवतीकर
धर्माबाद, 9423625769

-


15 OCT 2021 AT 6:16

सण दसरा

आंब्याच्या पानांची केली कमान
दारावर सजली नि वाढवली शान

पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार
देवाच्या गळ्यात शोभतो फार

अंगणात काढली छान रांगोळी
खायला केली गोड पुरणपोळी

आपट्याच्या पानाला सोन्याचं मान
आपल्या माणसाचे होई मानपान

आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा
होतो असा प्रत्येकाच्या घरी साजरा

- नासा येवतीकर, धर्माबाद

-


10 SEP 2021 AT 21:17

होता आगमन बाप्पाचे
आनंद होई घराघरांत
गणपती बाप्पा मोरया
नारा घुमतो दाहीदिशात

होता आगमन बाप्पाचे
लहान मुले नाचती गाती
मिष्टान्न मोदक नैवेद्याचा
गंध दरवळे अवतीभवती

होता आगमन बाप्पाचे
चैतन्य पसरे गावागावांत
वाजतगाजत येई गणराया
आनंद होई मनामनात

-


1 SEP 2021 AT 22:39

Don't Use Mobile
When You Are Driving

-


Fetching ना. सा. Quotes