मी माणूस शोधतोय...
एक चांगला। कर्तृत्ववान,धैर्यशील, सुसंस्कृत, प्रामाणिक, धैयाने झपाटलेला, समाज हित जोपासणारा
माणूस शोधतोय...-
जराशी कर ली गलती
तो क्या हुआ
आदमी है भाई,
चुकभूल होती रहतीहै,
अपने तो है सब,
फिर क्यों रूसवाई
किस बात की है परेशानी,
क्या हुआ अगर
माफी भी माँग ली तो,,-
माझी मराठीच भाषा मराठीच माती
या मराठी मातीत थोर दिग्गज जन्मती!
माझी मायबोली बहिणाबाईनं गायली
लताजीच्या कलावंताच्या कंठात विसावली!1
माझी मराठी भाषा साता समुद्रापार नांदते ,.
शब्दांची गोडी अवीट भुरळ जगाला पाडते.!
माझी मराठी भाषा नववारीत शोभते
नववारीच्या थाटात शब्द सुमनांनी सजते !
माझी मराठी आई जात्यावर ओवी गाई
आपुलकीचा गोतावळा कंठ दाटून येई !
माय मराठीची भिंत ज्ञानेश्वरीत चालली
तुकोबांच्या अंभगात बाई सुंदर सजली !
कीतीही होऊद्या इंग्रजी शिक्षणाचा प्रसार
माझ्या माय मराठी ची नाही सर येणार!
कुसुमाग्रजांच्या कविता सर्वांच्या ओठी
अभिजात दर्जा मिळो भाषेला मनीआस मोठी!..
सौ .लता गवळी .
-
धन्य धन्य आई जीजा
पिता शहाजी राजा
शिवनेरी गडावर
जन्मला शिवाजी माझा
बाळकडु दिले जिजाऊने
रयतेच्या राजा
विद्येमध्ये पारंगत केला
शिवछत्रपती राजा,
-
खुप आनंदाची बातमी
आम्ही परत ताईसोबत राहु शकतो लिहु शकतो याचा फार आनंद झाला, वाटले संपलं आता सगळं
हक्काने लिहायचो सगळे मीत्रमैत्रिणी फार छान कसलीही भीती नाही 2020 पासुन लिहतेय युवरकोटवर पण एकही वाईट अनुभव नाही
ताई तुला सलाम आणी आभार धन्यवाद शेवटच्या पानावर आज एवढचं सांगायचंहोतं
नयिन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹-
सोन्याचे शब्द चांदीचे अक्षर
अक्षरांच्या ओळी सुरेख
गुंफल्या भावनेच्या माळेत
सादर केल्या कोलाबच्या कप्प्यात
मैत्रीचा वाढला गजर
कोटस्चा भरला बाजार
एकापेक्षा एक रचना झाल्या साकार
युवरकोट ताईचं नाव घेते
आम्हां साहित्यिकांना व्यक्त
होण्याची संधी दिली म्हणुन
युवर कोटचे खुप खुप आभार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
-
जीवनाचे वर्तमान आपल्या
डोळ्यासमोर असावे
संसाररुपी बाग समृद्ध
व्हावी हेच ध्येय ठेवावे
बागेतल्या फुलांच सगोंपन
करणं कर्तव्य समजावे
कष्टाची तयारी अन्
मनाची उभारी कायम रुजावी
नाहीतर आहेत कितीतरी
उदाहरणे जगात
ऊद्वस्थ झालेली घरं,
निष्ठुर झालेली मनं,
अन् व्यसनाच्या आहारी गेलेले
अस्तित्वच हरवुनं
गेलेले भाग्यवानं..
-
अनमोल ठेवा जपावा ज्यानी त्यांनी
सुखाच्या वाटेवरचा आंनदी क्षण
अन् पावलागणिक च्या आठवणी
मनाच्या कोपर्यात ठेवाव्या साठवुण
-
# श्रावण #
ऋतुचक्राच्या सणवाराच्या श्रुखंलेमधला
हिरव्या रानी पाणोपाणी नटलेला
राखीच्या बंधनाला पंचमीच्या झोक्याला
माहेरच्या त्या आनंदाला मी श्रावण म्हणते..
बरसत राही सरसर पाऊस अंगणी
चोहीकडे पाणीच पाणी भिजते धरणी
गार वारा वाहे नेई ढगासवे वाहुनी
शेतकरी राजा सुखावतो पीक पाहुनी
गडगडणार्या ढगास त्या मी श्रावण म्हणते..
ऊन पावसाचा खेळ चाले
दृष्टीहीन ते खांद्यावर नाते घेऊन
आईबाप कावडीत घेऊन काशीस निघाले
मातापित्याच्या अगाध भक्तीस
त्या मी श्रावण म्हणते...
पुजापाठ,ऊपवास सोमवार महादेवाचा
भजन किर्तन सण ऊत्सव व्रतवैकल्याचा
बळीराज्याच्या बैलपोळ्याचा गौरी गणेशाचा
विघ्नहर्त्या गणरायास त्या मी श्रावण म्हणते।
लता गवळी ,औरंगाबाद,
-
जिंदगी का स्पर्श पाकर
कुछ खोया कुछ पाया
जो लगे अच्छा
ऊसे गले लगाया
सह लिया सबकुछ
आंनद पाकर
जीवन बिताया
-