#शुभ_ दिवाळी
लख्ख प्रकाश चोहीकडे, आशेचा सूर्य दर सकाळी असो,
सुख समाधान असावे सर्वत्र, प्रत्येकाची दिवाळी असो.
नवरंग, नवचेतना, प्रत्येक मनी, पवित्रतेच्या ध्यास असो,
रांगोळीचे रंग आयुष्यात, प्रत्येक घरी लक्ष्मीचा वास असो.
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, अंधारावर जशी मात असो,
एकात्मतेची भावना सर्वीकडे नक्षत्रांची मेहफिल जशी नभात असो.
पकवानांचा खमंग जसा, उत्साह उल्हास उमंग असो,
सुविचारांच्या सुगंध सर्व मनी, स्नान जसे अभ्यंग असो.
अन्न, वस्त्र, शिक्षण, निवारा परिपूर्ण दर थाळी असो,
प्रेम द्विप प्रत्येक मनामध्ये प्रत्येकाची दिवाळी असो.
-