प्रेम जिव्हाळ्या प्रलोभन मायेचे,
भुलवी भक्ताचे नाते गोते हरीसी,
सुटावा विळखा निगरगठ्ठ मायेचा,
दास हरीचा राहो निरपेक्षीत सदा |
अपेक्षाभंग करवी मायेचे स्वरुप,
निजरूप ठेवी स्वरुप तुझे हरी,
मन भजन-किर्तनात दंग रहावे,
मुखे स्मरण व्हावे रामकृष्णहरी |
धर्म अर्थ काम मोक्ष परमार्थ,
मती कुंठीत होते कामावरी,
काम क्रोध मद मत्सर अधोगती,
जडत्व अहंकाराचे आत्म्यावरी |
त्रागा व्यथा दुर, जाता पंढरी,
देहभान हरवी देवाची वारी,
आत्मग्लानीचा क्लेश न होई,
देह-भाव-गुन मन विठुचे पायी |
-