॥श्री॥
माझे पिता नि माता सर्वस्व देश आहे
वेचीन प्राण माझे स्वांतंत्र्य रक्षण्याला-
॥श्री॥
शेतात राबतो अन देतो जगास भाकर
मानवरुपात ईश्वर त्यालाच मी समजतो-
॥श्री॥
वादळ मनात उठले एका क्षणात अन मग
उद्घस्त होत गेले दोघांमधील नाते-
॥श्री॥
आकाश चांदण्यांचे अन चंद्र पौर्णिमेचा
बघताच गुंफतो मी गझलेत प्रेमधागा-
मनामधे असूया ठेवतो म्हणे मनामधे राहतो
चल म्हणतो आणि रस्त्यावर काटे पसरवतो
माणसानेच धोका दिला आहे माणसाला
आणि माणूस नियतिला धोकेबाज ठरवतो-
लाजून सखे ओंजळीत नको लपवू चेहरा तुझा
पौर्णिमेला अमावस्येचा बहुधा विचार दिसतो तुझा-
जेव्हां जेव्हां मला तिची आठवण येते
शब्द येती साथीला अन कविता सुचते-
॥श्री॥
वाटेत बांध येता फोडून त्यास जाते
पाणी तसे भिडावे तू संकटास आता-
॥श्री॥
पाण्यास रंग नाही पाण्यास जात नाही
सृष्टीस ते फुलविते पण त्यास ज्ञात नाही
तुज आस ईश्वराला प्रत्यक्ष भेटण्याची
माणूस हाच ईश्वर तो मंदिरात नाही
शब्दांस मोल नाही कागद अमोल आहे
विश्वास ठेवण्याचा तेथे प्रघात नाही
सर्वस्व फक्त पैसा सारेच भ्रष्ट येथे
धन सांगतात आम्ही नाहीच खात नाही
का पारतंत्र्य त्यांनी स्वातंत्र्य मानलेले
पेटेल राष्ट्र ऐसी कोठेच वात नाही-
॥श्री॥
या शब्दांनो लेखणीतून माझ्या झरझर
हस्ताची सर हृदयामधून यावी अलगद-