जपलंस मला तू
पुस्तकातल्या मोरपिसासारखं
अलगद जवळ घेतलंस
गुलाबाच्या फुलासारखं
मोरपिसातील रंग जणू उधळून लावले मनी
गुलाबाच्या स्पर्शाने धुंद झाले या क्षणी
आलास तू जवळी असा
चिंब ओली मी झाले
आपल्या प्रेमाचे क्षण हे
अलगद तुलाही जाणवले
गुणगुणले गीत सवे
दोघांनी गायिले
प्रेम नाही प्रेम नाही म्हणता
शेवटी शब्द ओठांवर उमटले
किती गोड क्षण तो
मी प्रत्येक क्षण अनुभवला
कणात कणात आवाज तुझा
जणू कोरून ठेवला
गुलमोहर असा हा
अनंत असाच राहूदे
त्याच्या फुलांचा सडा
फक्त मला वेचूदे
- Aakanksha Mali
13 JUN 2020 AT 0:30