मला माझ्या पिल्लुडीला Proposed करायचंय
तर कविता लिहायची आहे ..कशी लिहू?
तु फक्त माझी आहे म्हणू..?
कि,मी फक्त तुझाच अस म्हणू..?
तू मला खुप आवडते म्हणू..?
की, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे असं म्हणू..?
तुझ बोलण माझ्या हृदयाला शांत करत अस म्हणू..?
की, तुझे शब्द मनाला अलगद स्पर्श करतात असं म्हणू..?
जर दूर गेल्यावर काळजी वाटते म्हणू..?
की, समोर दिसल्यावर हृदयाचे ठोके वाढतात अस म्हणू?..
तू खूपच सुंदर, मनमोहक दिसते म्हणू..?
की माझ्या स्वप्नातील तूच परी अस म्हणू..?
मला फक्त तुझ्यासोबत जगायचंय म्हणू..?
की मी तुझ्या शिवाय जगूच नाही शकणार अस म्हणू..?
मला तुझ्यासोबत लग्न करायचंय अस म्हणू ..?
की, तुझी साथ मला जीवनभर हवी आहे असं म्हणू..?
माझ्या नावासोबत तुझ नाव लावशील का म्हणू..?
की KFC,BURGER,PIZZA HUT च्या जमान्यात..?
माझी नाक्यावरची पाणीपुरी बनशिल का अस म्हणू..?
म्हणू त कस म्हणू ??
पिल्लुडे.. I LOVE YOU.., असच म्हणू..??
(Shubham Deøkar)
-