QUOTES ON #ABOL

#abol quotes

Trending | Latest
4 AUG 2020 AT 16:12

विषय बोलणार नाही तुझा विषय असूनही
अबोल राहील तिथेही जिथे नको असायला हवे
तू माझ्यात असताना देखील कुणालाही दिसणार नाही
कारण उगाच अफवा पसरवन बरे नव्हे !

-


11 MAY 2021 AT 15:25

न काही बोलता ओळखेल का मन कोणी माझं
माझ्या नजरेतून समजेल का भावना माझ्या
अबोल प्रीत माझी
मिळेल का साथ कोणाची???

-


21 SEP 2020 AT 20:47

अबोल माझे शब्द
अबोल त्याची प्रीती
शब्दांन मध्ये मी
सांगू तरी किती ?

-


30 JUL 2021 AT 19:26

रुसलेले शब्द माझे, अन् तुझी प्रीती अबोल
सांग ना रे कसे जुळऊ ,मी मनाचे ताल...

मूक साद या मनाची ऐक ना कधीतरी
हाक दे ना.. मज तूही, येईन त्या वाऱ्यापरी.

बहरू दे ना प्रीत अपुली, त्या निशिगंधा परी
दरवळू दे सुगंध त्याचा,सर्व रोम रोमा तुनी.

का दुरावा? अन् किती वेदना सोसायच्या
किती आणखी विरहाच्या, ज्योती पेटवायच्या.

एक शब्द,नजर एक, मार कडाडून एक मिठी
स्वर्गही मग वाटे थिटे...तुझ्या बाहू पाशा मध्ये

-


21 JUN 2019 AT 14:19

अबोल तू आहेस ते कळले आहे मलाहि
तुझ्या या मौनाचे मात्र उत्तर काहीच नाही !!😞😞
सांग तु मला जर चुकले असेन मी
शांत राहणे हा काही उपाय नाही!! 😔😔
सोबतीची लय तू सोडू नकोस आता
विसरून जा जर चुकले असेल काही !!😐😐

-


14 NOV 2022 AT 14:34

नको वाटतं आता हे शहाणपण,
पुन्हा हवं हवसं वाटतं ते बालपण..😊

-


22 JUL 2020 AT 13:29

आवडला जरी तो आभास का मी जपून ठेवू शकत नाही
डोळे बंद करता तो दिसतो मग डोळे उघडता का नाही !
सतत वाटे जिवा अपूर्ण आहे सगळं असूनही काही
खात्री असूनही जीवाची असे का वाटे आपण जिवंतच नाही !
क्षण सुटत चालले माझ्या मुठीत काही नाही
आठवणी असता सुद्धा असं का वाटते कधी जगलेच नाही !
खोट असलं सगळं तरी मन मानायला का तयार नाही
नात्यातली दोर गाठ बांधलेली तुटत पण नाही !
वेळेचा काटा तो कधी कुणासाठी थांबायला तयार नाही
मी बसले उगाच स्वप्न पाहत , साध्य करून दाखवायला काही नाही !
कुणाला हृदयातली बाब कळायला माझ्या कडे शब्द पण नाही
आणि आता सांगा कुणाव अस वाटत पण नाही !

-


16 DEC 2018 AT 15:14

आसवांच्या त्या धारा
नकळत गालावर ओघळताना
विरहाच्या त्या भावना पहिल्या
काळीज माझं जाळताना…

-


3 DEC 2019 AT 11:10

तुझ्या चेहऱ्यावरचा राग आणि तुझा अबोला,
सगळं काही कळतंय मला.
मेत्रीपेक्षा जास्तीची अपेक्षा ठेवली,
आणि तुझी मैत्री ही गमावली.
इतरांसारखे नाटकी वागणं कधीच जमलं नाही मला,
आणि मला समजणे कधीच जमलं नाही तुला.
कारण तुला ही सवय झाली आहे त्या खोटेपणाची,
नाहीतर तुला पारख असती माझ्या खरेपणाची.

-



सांग डोळ्यांत लपवू
कशी मी तुला?💕

-