Rajesh Malewale patil   (Mahesh malewale)
45 Followers 0 Following

Joined 17 July 2018


Joined 17 July 2018
10 FEB 2022 AT 22:42

तेव्हा आणि आज..

तेव्हा विरहाची भीती होती
पण सहवासाची ख़ुशी होती.
आज सात जन्माची गाठ आहे
पण पावलो-पावली दुःख आहे..

तेव्हा भविष्याची चाहूल होती
आज भूतकाळात मन रमतं.
तेव्हा समजूतदार होण्याची जिद्द होती
आज अल्लड्पणा हरवल्याची खंत आहे..

तेव्हा आश्वासनांची दुनिया होती
पण ती मनातली होती.
आज वस्तुस्तिथीची आहे
पण ती वरवर वाटतेय..

तेव्हा बरंच काही नव्हतं
पण लढण्याची जिद्द होती.
आज तसं सर्व काही आहे
पण जगाण्यात सुद्धा हिम्मत नाही..

तेव्हा समस्यांचं वादळ होतं
पण साथ खंबीर होती.
आज तसा दिलासा आहे जीवनाकडून
पण, वसंतातही ग्रीष्म जाणवतोय..

— % &

-


10 AUG 2018 AT 21:37

कोणीतरी मला विचारलं, "तु देवाला मानतोस का?",तर मी सांगितल मी माझ्या आईला मानतो.कारण मला माझ्या आई मध्ये देव दिसते.

-


18 JUL 2018 AT 1:38

गम ने हसने न दिया, ज़माने ने रोने न दिया!
इस उलझन ने चैन से जीने न दिया!
थक के जब सितारों से पनाह ली!
नींद आई तो तेरी याद ने सोने न दिया!

-


17 JUL 2018 AT 23:17

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…..

-


17 JUL 2018 AT 23:08

वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का

...पहिला तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास

तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढ़ायचास

काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास

दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायचास
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिडवायचास

माझा चेहरा पडला तर
खुप नाराज होयचास
हळूच जवळ घेउन
सॉरी बोलायचास

आज ही मला तुझा
सारखा होतो भास्
कारे असा वागतोस
का देतोस त्रास

नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास.


-


Seems Rajesh Malewale patil has not written any more Quotes.

Explore More Writers