Shailesh Řauť   (© शै. भा. राऊत.)
169 Followers · 89 Following

read more
Joined 11 February 2018


read more
Joined 11 February 2018
1 MAR 2018 AT 5:05

तुझ्या गोऱ्यागोमट्या अंगावरती,
सपकन आदळून रंग हे,
पांढऱ्या रंगाशी भांडले होते;
"मी चंद्राला आज इंद्रधनुष्य होतांना पाहिले आहे..."

-


20 JUN 2020 AT 12:07

No one out there for you rather than your parents ,who will keep you happy throughout your whole life.

-


20 AUG 2019 AT 15:32

ती फक्त भेट नव्हती तर सोहळा होता!
मंतरुन टाकणाऱ्या नजरेने पावलांना थबकण्याचा बहाणा दिला..ओठांनी मुकेपण जोपासलं अन नजरेनेच तू बोलका इशारा देत राहीलीस..
व्हिडिओ कॉल मध्ये कॅमेरा पलीकडे नेहमी उभी असलेली तू..आज माझा स्पर्श होऊ शकेल एवढ्याशा अंतरावर उभी होतीस..
अस म्हणतात ना , शब्दांपेक्षा स्पर्श बोलका असतो.. अगदी हेच खरं मानत,
मी हातहाती घेतलेला तुझा,
न..राहवून भाळी ओठांनी कोरलेलं एक छानसं चित्र प्रीतीच..
तेंव्हा तू पापण्यांना मिटून उजेड दूर सारला होता..काही वेळ तर समाधी लाभलेली देहाला अन श्वासांनी घट्ट केलेली ती मिठी,
सगळं काही न उमजणार.
मी सांगत राहिलो रोज रात्री तुझ्या आठवणीत कोरलेल्या सुंदर क्षणांचे किस्से तुला..
तुला ऐकवत होतो तूच दिलेले शब्द..
अन
माझं आयुष्य व्यापून भोवती केलेला परीघ..
ज्याचा केंद्रबिंदू तू होतीस...
तू आहेस तू असशील हे शाश्वत सत्य आहे...

-


5 MAY 2019 AT 12:47

तू असताना तुझं नसणं कधीच जाणवलं नाही.
उन्हाने सावलीचा हात धरून चालायचं अगदी तसंच नातं जपलं तू..
समजुतीने घेतलं की सुकर होत जातं आयुष्य, नातं बहरायला लागतं आणी जगणं सुगंधी होऊन जातं..
म्हणून कधी रागावलो तरी तू निमुटपणे ऐकत ऐकत पापणी ओली कारायचीस फक्त...
माझ्या रागवण्याचा निकष तू कधीच लावला नाही अन
कधी चुकून ही मला जाब विचारला नाही.. सांगेल तसंच वागत गेलीस.. तुला कितपत बदलू शकलो माहिती नाही पण तुझ्या येण्याने माझं आभाळ उजळल एवढं माञ खरं..!

- © शै.भा.राऊत.

-


1 MAY 2019 AT 18:01

स्वीकारता पण येत नाही
अन नाकारता पण येत नाही. खोट काहीच नाही सगळं खरं,
पण जगासमोर खरं असण्यात तुम्ही सुखी व्हालच असं नाही.
जबाबदारी परिस्थितीनुसार येते, जबाबदारी टाळणं आपल्या हातात असतं पण परिस्थिती नाही..
अन बदलत्या वेळेनुसार जिथं माणसं बदलायला शिकतात तिथं एक तर स्वार्थ साधला जातो नाही तर मनाव्यतिरिक्त निर्णय लादला जातो.
शेवटी,
दारावर आलेलं सुख कुणाला नकोस असतं.
मी पण हेच स्वीकारलं असतं जे तिने स्वीकारलं..

- ©शै.भा.राऊत.

-


26 APR 2019 AT 0:09



तेरे आने की जब ख़बर महके
तेरी ख़ुशबू से सारा घर महके

शाम महके तिरे तसव्वुर से
शाम के बाद फिर सहर महके

रात भर सोचता रहा तुझ को
ज़ेहन-ओ-दिल मेरे रात भर महके

याद आए तो दिल मुनव्वर हो
दीद हो जाए तो नज़र महके

वो घड़ी-दो-घड़ी जहाँ बैठे
वो ज़मीं महके वो शजर महके

- नवाज देवबंदी..

-


24 APR 2019 AT 0:53

तू समजावलं असतं तर निस्तारता आलं असतं सगळं..
तुझं गप्प राहणं हा पर्याय न्हवता. अबोलपणा छळतो फक्त मनाला, त्यापासून निराकरण होत नाही..
नातं टिकवायचं तर संवाद असायला हवा नात्यात.
मनात दडपून ठेवलेल्या मूक भावनांना तू बोलत करायला हवं होत..
मी समजूनच घेत आलोय तुला आणि हीच सवय जोपासली मी..
तू मनाचं ऐकून लादत गेली निर्णय मेंदुवर ..
मिथ्य गोष्टींना पुरावा ही दिला तुझ्या मनाने अन सत्य नजरेआड केलं..
शक्यता चाळता नाही आल्या तुला..तू फक्त पर्याय म्हणून बघत होतीस भविष्याला अन वाहवत गेलीस वर्तमानासोबत..
तुला माहितीय तुझ्या डोळ्यांत स्वतःला बघितलं की आरसा ही टाळायचो मी..
"प्रतिबिंब होतीस माझं तू.."
अन, जेंव्हा आरशाला तडा जातो ना ..
तेंव्हा जोडण फार अवघड असतं..
अस्वस्थता फार काळ टिकवून ठेवलीच नाही कधी उंबरठ्यावर तुला बघितलं की हसू उमलायच चेहऱ्यावर..
आज तुझ्यावाचून ओसाड पडलंय आंगण अन पोरका झालाय उंबरठा..
प्रत्येक बंधासाठी काही बंधने असतात ..
ही वाट ओलांडायची नसते, द्यायचा नसतो फाटा नात्याला..
हे टाळता नाही आलं तर..
ज्याचं त्याचं ज्याने त्याने निसरायचं असतं..

इथे नात्याला पूर्णविराम लाभतो.

- शै.भा.राऊत.
🍂

-


17 APR 2019 AT 23:36

सांज मोहरु लागते तसा तसा बहरू लागतो पारिजातक अंगणातला..
उन्हाची नाजूक पाऊलं उंबरठ्यावर पडतात अन किलबिलणाऱ्या पक्षांचा मधुर आवाज कानाला खुणावत राहतो..
हळूहळू उजळू लागतो दिवस तुझ्या आठवणीत..
कामाचा व्याप तो असतोच पण त्यातही वेळ मिळेल तसा मी तुला मांडत राहतो..
शेवटी,
मनाला हवं असतंच ना कोणीतरी सांभाळायला..
माझा दिवस सरण्यासाठी तुझा एक 'ख्याल'
पुरेसा असतो..

-


17 APR 2019 AT 6:34

हातात-हात अन समांतर दिशेने चालणारी पावलं समोर समोर जातांना वाळूवर पावलांनी कोरलेल्या सुंदर नक्षी,गालाला स्पर्शून जाणारा वारा, ढगांच्या गुलाबी सावल्या, अल्लड होऊन लाटांसोबत नभात घिरट्या घालणारा पक्षांचा थवा,एकमेकांचं अस्तीव शोधणारी नजर,
पावलाना स्पर्शून जाणाऱ्या लाटा,नजरेत न मावणारा समुद्र,
शेवटी,
थकलेल्या डोळ्यांनी आधार घेतला होता खांद्याचा..
सारं सारं
अजूनही तरुण आहे..

- © शै.भा.राऊत.

-


6 APR 2019 AT 23:53

मैं इस उम्मीद पे डूबा की तू बचा लेगा
अब इसके बाद मेरा इम्तेहान क्या लेगा

(ये एक मेला हैं वादा किसीसे क्या लेगा
ढलेगा दिन तो हर एक अपना रास्ता लेगा)

हजारो तोड़ आओ उससे रिश्ते 'वसीम'
मैं जानता हूँ ओ जब चाहेगा बुला लेगा

-वसीम बरेलवी..

-


Fetching Shailesh Řauť Quotes